Shinde-Fadnavis Government
Shinde-Fadnavis Government 
महाराष्ट्र

हद्दच झाली! सावरकरांसाठी दिल्लीतील सावित्रीबाई-अहिल्यादेवींचे पुतळे हटवले; BJP सरकारवर टीकेची झोड

Sandip Kapde

आज (रविवार) वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने त्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्थापित वीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत होते.

संसद भवन संकुलातील नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आज दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्र सदनातील वीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर सर्वांनी एकजुटीने थोर स्वातंत्र्यसैनिकांना नमन केले.

मात्र आता मोठा वाद निर्माण झाला आहे. सावरकरांच्या जयंतीसाठी महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही.

हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: 'सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्ती पोहोचला EVM ठेवलेल्या ठिकाणी'; निलेश लंकेंनी व्हिडिओ ट्वीट केल्याने खळबळ

Loksabha Election : स्टार प्रचारकांची फौज दिल्लीत;२५ मे रोजी मतदान; मोदी, नड्डा, खर्गे, राहुल, प्रियांका घेणार सभा

Pune Porsche Accident: करोडोंची कार वापरणाऱ्या अग्रवालने सतराशे रुपयांसाठी रखडवलेले पोर्शेचे रजिस्ट्रेशन

Latest Marathi News Live Update: शुक्रवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

Jammu & Kashmir: 'कलम 370 हटवण्याचा निर्णय योग्य'; सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या

SCROLL FOR NEXT