Uddhav-Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै २०२० अखेर २७.३८  लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील ८३ टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाहीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली. योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे, त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविली जावी. कर्जमाफी योजनेसाठी २१ हजार ४६७ कोटी रुपयांची आवश्‍यकता होती. त्यापैकी १७ हजार ६४६ कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना योजनेतून देण्यात आला आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये तसेच बॅंकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध केली आहे. यापैकी २०१९-२० या आर्थिक वर्षात जवळजवळ १९ लाख खातेदारांना ११ हजार ९९३ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता; तर २०२०-२१ या वर्षात आतापर्यंत एकूण ५ हजार ६५३ कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रक्रिया पुन्हा सुरू
कर्जमाफी योजनेंतर्गत निर्गमित केलेल्या यादीतील उर्वरित ५.५२ लाख खातेदारांनी त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांना योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ मिळेल. त्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा होईल. मार्च २०२० मध्ये राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे लागू झालेली आचारसंहिता व तदनंतर कोविड या महामारीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणे शक्‍य झाले नव्हते; परंतु आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Ganesh Visarjan Live: गणपती विसर्जनासाठी पुण्यात कडेकोट बंदोबस्त; आठ ते दहा हजार पोलिसांचा ताफा तैनात

Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

Chha.Sambhaji Nagar: एएस क्लब उड्डाणपुलावरून तरुणीने घेतली उडी

Mayuresh Prabhune : पाऊस पडतोय तरी दुष्काळ का? महाराष्ट्रातील दुष्काळाचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT