Scholarships esakal
महाराष्ट्र बातम्या

Scholarships: विद्यार्थांसाठी गुड न्यूज! परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत कार्यान्वित होत असलेल्या परदेश शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरवर्षी इतर मागास वर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्याना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

राज्य शासनाच्या इतर मागासवर्गीय विभागाची अत्यंत महत्वाची योजना असून २०१८-१९ पासून राबविली जात आहे.

इतर मागास वर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्वेश होय.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२३ पर्यंत होती.

आता या अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२३ ठेवण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्ययावत जागतिक क्रमवारीच्या २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ५० विद्यार्थ्याना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रांसह, संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, ३ चर्च पथ, पुणे – ४११००१ या पत्यावर सादर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT