Teachers 
महाराष्ट्र बातम्या

शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत; हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न सुटणार?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी द्यावी, या मागणीच्या पूर्ततेसाठी अर्थ खात्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्याची माहिती डी.एड., बी.एड. स्टुडन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्यासाठी मे महिन्यात सरकारने पदभरतीवर बंदी घालण्यात आली. मात्र, दहा-बारा वर्षापासून रखडलेली शिक्षक भरती तीन वर्षांपूर्वी सुरू झाली आणि कोरोनामुळे त्यालाही स्थगिती देण्यात आली. परिणामी शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भरती प्रक्रियेला वित्त विभागाने विशेष परवानगी द्यावी, या मागणीच्या पुर्ततेसाठी डी.एड., बी.एड. स्टुडन्ट असोसिएशनमार्फत औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय अन्नत्याग पायी दिंडी आंदोलन सुरू केले होते.
ही दिंडी ठाण्यामध्ये दाखल झाल्यावर शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आंदोलनकर्त्याची दखल घेऊन संघटनेच्या संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर शालेय शिक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळाला आमंत्रित करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सावंत, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर, राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे, जीवन काकडे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत ५० टक्के मागासवर्गीय पदे भरतीबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच कार्यवाही करणार असल्याची माहिती देखील यावेळी दिल्याचे मगर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT