महाराष्ट्र बातम्या

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

पूजा विचारे

मुंबईः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांसंदर्भातली मोठी बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येत्या १ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरु होणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र ही चर्चा शिक्षणमंत्र्यांनी फेटाळली आहे. आरोग्य विभागाच्या मंजुरीनंतरच पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलंल आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

पुढे शिक्षणमंत्री म्हणाले की, यासंदर्भात अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. सुरुवातीला आमचा प्रयत्न होता की, नववी ते बारावी हे वर्ग सुरु व्हावेत. असा सरकारचा दृष्टीकोन होता. त्यानुसार आम्ही स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. तसंच त्या संदर्भातली संपूर्ण माहिती घेत आहोत. २५ नोव्हेंबरपासून २५ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु झाल्या. त्यात ३ लाखांपर्यंत विद्यार्थी येत होते.  गेल्या आठवड्यात जी माहिती घेतली. त्यावेळी ती संख्या  ५ लाखांपर्यंत झाली आहे. या आठवड्याची माहिती मागवली आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता शाळा सुरु झाल्या आहेत. 

दरम्यान सध्या नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय आहे. त्यात मुंबई, पुणे, नाशिकमध्ये शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यात तसा निर्णय घेता येईल. पाचवी ते आठवीचे विद्यार्थी लहान असतात. त्यामुळे त्यांना बोलावयाचं झालं तर नेमकी काय परिस्थिती आहे. हे पाहावं लागेल. यासाठी आमचं रोज आरोग्य विभागाशी संबंध असतो. आज कॅबिनेटची बैठक देखील आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्येही समजेल की, राज्याची काय परिस्थिती आहे. त्यानुसार भविष्यात त्यावर निर्णय घेऊ, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Schools from 5th 8th start after permission Ministry Health
Information Varsha Gaikwad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

Baramati News : वीजेच्या वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरु

SCROLL FOR NEXT