School Media Gallery
महाराष्ट्र बातम्या

यंदाही शाळा राहणार बंदच ! दिवाळीनंतर आठवी ते बारावीचा निर्णय

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे या वर्षीही शाळा बंदच राहणार आहेत

तात्या लांडगे

ऑनलाइन शिक्षण सुरू झाले, तरीही ते फुकटात येत नाही. त्यांनाही शिक्षकांचे मानधन द्यावे लागते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरीही पालकांना खासगी शाळांची फी भरावीच लागेल, असे शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले.

सोलापूर : राज्यातील नगर (Ahmednagar), सोलापूर (Solapur), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur), गोंदिया (Gondiya) या जिल्ह्यांचा मृत्यूदर सर्वाधिक असून, अजूनही 14 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या कमी झालेली नाही. दुसरीकडे कोरोनाच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असून, त्यात सर्वाधिक धोका बालकांनाच असल्याचाही अंदाज आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही ऑफलाइन शाळा सुरू होणार नाहीत, असे शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) स्पष्ट केले आहे. दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, असेही सांगण्यात आले. (Schools will remain closed this year due to fears of a third wave of corona)

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 11 हजार तर राज्यातील जवळपास एक लाखाहून अधिक बालकांना (0 ते 18 वयोगट) कोरोनाची बाधा झाली असून, काहींचा मृत्यूही झाला आहे. सध्या मुंबई (Mumbai), नाशिक (Nashik), नगर, पुणे (Pune), कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली (Sangli), सिंधुदुर्ग (Sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri), अमरावती (Amravati), बुलढाणा (Buldhana), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सावध पवित्रा घेत संसर्ग कमी होईपर्यंत ऑनलाइन शिक्षणावरच भर राहील, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, सद्य:स्थितीत ऑफलाइन शाळा सुरू करणे उचित ठरणार नाही, असा अभिप्राय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन संबंधित जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ऑफलाइन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग तर संसर्ग पूर्णपणे कमी झाल्यावर पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू होतील, असा अंदाज शिक्षण विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी व्यक्‍त केला. तूर्तास स्वाध्याय पद्धतीनेच त्यांचा सराव घेतला जाईल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन शिक्षणाची फी द्यावीच लागेल

कोरोनामुळे यंदाही शाळा ऑफलाइन सुरू होणार नाहीत. 14 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यानंतर पालकांना संबंधित खासगी शाळेला शैक्षणिक फी द्यावीच लागेल. परंतु, संपूर्ण वर्षाची फी भरताना पालक व शाळांनी आपापसात त्याचे टप्पे पाडावेत. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले, तरीही ते फुकटात येत नाही. त्यांनाही शिक्षकांचे मानधन द्यावे लागते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरीही पालकांना खासगी शाळांची फी भरावीच लागेल, असे शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय जगताप यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

वर्गनिहाय मुलांची संख्या

  • पहिली ते आठवी : 1,46,86,493

  • नववी ते बारावी : 56,48,028

  • एकूण विद्यार्थी : 2,03,34,521

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT