accident sangola pandharpur road
महाराष्ट्र बातम्या

पंढरपूर- कराड रोडवर सात महिलांना ट्रकने चिरडले! रस्त्यावर एसटी बसची वाट पाहात थांबलेल्या 7 पैकी 5 महिलांचा जागीच मृत्यू

चिकमहूद येथील शेतातील मजुरीचे काम आटोपून घरी निघालेल्या महिलांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडले आहे. त्यात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : चिकमहूद येथील शेतातील मजुरीचे काम आटोपून घरी निघालेल्या महिलांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडले आहे. त्यात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सांगोल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत.

या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतातील काम संपल्यानंतर दुपारून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या पंढरपूर- कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. ट्रक ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या सात महिलांच्या अंगावर वाहन नेले. नेहमीप्रमाणे त्या महिला काम आटोपल्यानंतर एसटी बसने गावी जाण्यासाठी पंढरपूर- कराड महामार्गावर थांबल्या होत्या. पण, अचानक भरधाव वेगाने तो ट्रक त्यांच्या दिशेने आला. बाजूला महामार्गाचे लोखंडी बॅरिगेट असल्याने त्यांना बाजूला सरकताच आले नसल्याची चर्चा त्याठिकाणी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT