Sharad Pawar-Shalinitai Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

शिखर बॅंक घोटाळ्यात थोरल्यासह धाकट्या पवारांचा हात

घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल

राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) सभासद शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते (NCP leaders) रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. न्यायालयाच्या (Court) आदेशानुसार सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठीच ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना (ED action on Jarandeshwar factory) ताब्यात घेतल्याचे जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील (Dr. Shalinitai Patil) यांनी येथे झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलताना सांगितले. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ईडीने योग्य तो निर्णय घ्यावा, यासह नऊ ठराव या सभेत झाले.

शिखर बॅंकेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यात राष्ट्रवादीच्या थोरल्या, तसेच धाकट्या पवारांचाही हात आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा श्रीमती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष शंकरराव पाटील, श्रीरंग सापते, पोपटराव जगदाळे, शहाजी भोईटे, दत्तूभाऊ धुमाळ, अक्षय बर्गे, संतोष कदम, शंकर मदने, राहुल चव्हाण आदींसह संचालक, सभासद, शेतकरी उपस्थित होते. श्रीमती पाटील म्हणाल्या, ‘‘न्यायालयाच्या आदेशाने ईडीने नुकताच ताब्यात घेतलेला जरंडेश्वर कारखाना ईडीकडून आपल्याला मिळेल. सहकारमंत्री अमित शहा आपल्याला नक्कीच सहकार्य करतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही जरंडेश्वरबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.’’ वसंतरावदादांच्या पेन्शनमधून मी माझा औषधांचा खर्च करत आहे. तुम्ही दिलेली आमदारकी, तसेच सांगलीकरांनी दिलेल्या खासदारकीच्या पेन्शनवर जरंडेश्वरची लढाई लढत आहे, असे म्हणत त्या वसंतरावदादा यांच्या आठवणींनी गहिवरल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून त्या म्हणाल्या, ‘‘शिखर बॅंकेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यात राष्ट्रवादीच्या थोरल्या, तसेच धाकट्या पवारांचाही हात आहे. या घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल.’’ सभेत चहाऐवजी सभासदांना पेढे वाटा, अशी सूचना श्रीमती पाटील यांनी करताच कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. काही मंत्री जरंडेश्वर सोसायटी मोडून काढायला निघालेत, असे नमूद करत समाजाविषयी देणे-घेणे नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असेही श्रीमती पाटील यांनी सांगितले. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक किसनराव घाडगे यांनी वाचून दाखवलेल्या नऊ ठरावांना सभेने मंजुरी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT