Shalinitai Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'अजित पवार, अशोक चव्हाणांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा'

राजेंद्र वाघ

अजित पवारांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून आणि सत्तेचा अधिकार वापरून बेकायदेशीरपणे जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतलाय.

कोरेगाव (सातारा) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) कवडीमोल भावाने गिळंकृत केलाय. आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा अधिकार वापरून बेकायदेशीरपणे जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतला. त्यामुळे अजितदादांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील (Dr. Shalinitai Patil) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय.

यासंदर्भात माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जरंडेश्वर साखर कारखानाप्रकरणी जबाबदार असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा दुरूपयोग करून कारखान्याचा बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन ऊस उत्पादक सभासदांचा विश्वासघात केला आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात डॉ. शालिनीताई पाटील यांनी म्हटले की, मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजितदादा, अशोक चव्हाण (Ashok Chavan) यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने गिळले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. हजारो शेतकरी सभासदांची त्यांनी फसवणूक केलीय. अजित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कमी किमतीत बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन कोरेगाव-खटाव तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.

उच्च न्यायालयाने अजितदादांची फसवणूक उघडकीस आणली आणि साखर कारखान्याच्या विद्यमान खाजगी संचालकांच्यावर गुन्हे दाखल केले. आज ईडीच्या माथ्यमातून साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई ईडीच्या माध्यमातून सुरु आहे. कमी किमतीत सहकारी साखर कारखाने गिळंकृत करणाऱ्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे त्यांना मंत्री मंडळातून काढून टाकण्याची शिफारस राज्य शासनाकडे राज्यपालांनी करावी, अशी मागणी माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीरंग सापते, संचालक पोपटराव जगदाळे, कार्यकारी संचालक किसनराव घाडगे, संचालक अक्षय बर्गे, काकासाहेब कदम, शंकर मदने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT