Shambhuraj Desai vs Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

तुम्ही पहाटेचा शपथविधी केला, ती बेईमानी नव्हती का? शंभूराज देसाईंचा अजितदादांवर घणाघात

'ते' करताना पक्षप्रमुख शरद पवार साहेबांना विचारलं होतं का?

सकाळ डिजिटल टीम

'ते' करताना पक्षप्रमुख शरद पवार साहेबांना विचारलं होतं का?

Politics News : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवून आणलं आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गट शिंदे गटाविरुध्द आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदारांनी राष्ट्रवादीसोबतही पंगा घ्यायचं ठरवलं आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी थेट अजित पवारांवरच निशाणा साधायला सुरुवात केलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी नेते असून त्यांच्यासोबत ४० आमदार, १२ खासदार, १४ राज्यांचे राज्यप्रमुख, बहुतांशी जिल्हाप्रमुख एकवटले आहेत. त्यामुळं २०१९ मध्ये जे ४८ तासांचं सरकार अजितदादांनी केलं होतं. ती बेईमानी नव्हती का? तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी केला. तो करताना पक्षप्रमुख पवार साहेबांना विचारलं होतं का? असा सवाल शंभूराज देसाईंनी अजित पवारांना (Ajit Pawar) केलाय.

'शिंदे साहेबांनी कधीच बेईमानी केली नाही'

शंभूराज देसाईंनी आज पाटणमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. एकनाथ शिंदे ज्या पक्षात राहिले व वाढले, तिथंच त्यांनी बेईमानी केली, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, 'शिंदे साहेबांनी व आम्ही कधीच बेईमानी केलेली नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार जे हिंदूत्वाच्या विचारांपासून बाजूला नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलं. ते शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्याचं काम आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं आहे.'

'ते आम्ही सहन करणार नाही'

त्याला बेईमानी हा शब्द अजितदादा पवार वापरत असतील. तर त्यांनी मागील काळात २०१९ मध्ये जे ४८ तासांचे सरकार केलं होतं. ती बेईमानी नव्हती का? असा सवाल देसाईंनी उपस्थित केलाय. आम्हाला एवढा मोठा भक्कम पाठिंबा मिळत असताना त्यांच्या कृतीला आमच्या भूमिकेला व उठवाला बेईमानी शब्द वापरतात, हे पूर्णपणे चुकीचं असून ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी अजितदादांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT