CCTV Footage sharad mohol
CCTV Footage sharad mohol esakal
महाराष्ट्र

CCTV Footage : शरद मोहोळवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक Video; गोळी झाडताच 'असे' झाले हल्लेखोर पसार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली असून पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

(Sharad Mohol murder case)

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज शनिवारी समोर आलेलं आहे. दोघे हल्लेखोर गोळी झाडून पसार होताना दिसतायत. गोळी लागताच शरद मोहोळ खाली कोसळला. हल्लेखोराच्या मागे एकजण धावल्याचं दिसून येतंय. तर खाली कोसळलेल्या जखमी शरद मोहोळला उचलून दोघेजण नेत आहेत. हा व्हिडीओ सर्व वृत्तवाहिन्यांची प्रसारित केला आहे.

Eight persons including main accused were arrested by Pune Police

दरम्यान, गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केलीय. पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी- शिरवळदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसं आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या. आरोपींविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आर्थिक आणि जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ आणि त्याचे कुटुंबीय कोथरुडमधील सुतारदरा परिसरात राहतात. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ कार्यालयातून घराकडे जात होता. त्यावेळी ही घटना घडली.

मोहोळच्या गळ्याजवळ, छातीवर आणि उजव्या खांद्याजवळ गोळ्या लागल्या. तर एक गोळी आरपार गेली. गंभीर जखमी अवस्थेत मोहोळला कोथरूडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT