PM MODI SHARAD PAWAR Offer esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi Offer Sharad Pawar: सगळी स्वप्ने पूर्ण होतील.. पंतप्रधान मोदींची शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर!

PM Modi in Nandurbar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमधील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

कार्तिक पुजारी

नंदुरबार- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमधील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केलं होतं. यावरुन पंतप्रधान मोदी यांनी समाचार घेतला. बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. त्यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावं असं ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचे एक दिग्गज नेता. गेल्या ४०-५० वर्षांपासून राजकारणात आहेत. ते काहीबाही बोलत असतात. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी वक्तव्य केलंय. त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करुन असं वक्तव्य दिलं असावं असं मला वाटतं. ते निराश आणि हाताश झाले आहेत, असं मोदी म्हणाले.

४ जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल असं त्यांना वाटत आहे. याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे तुम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना साथ द्यावी. सर्व स्वप्न पूर्ण होतील, असं मोदी म्हणाले.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत भाष्य केलं होतं. आमची आणि काँग्रेसची विचारधारा सारखी आहे. आमचा सोबत काम करण्याचा अनुभव आहे. निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेचा धुराळा उडाला होता. अखेर शरद पवार यांनाच यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. पण, आता पंतप्रधान मोदी यांच्या ऑफरमुळे वेगळ्या चर्चेचा तोंड फुटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नंदुरबारमधील सभेत काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली. काँग्रेसचा काय हेतू आहे हे जनतेनं लक्षात घ्यावं. राहुल गांधी यांचे गुरु जे परदेशात राहतात त्यांनी भारतीय लोकांवर वर्णभेदी टिप्पणी केली. भारतीय लोक आफ्रिकन दिसतात असं ते म्हणत आहेत. काँग्रेसचे लोक म्हणतात 'मोदी तेरी कबर खुदेगी'. या काँग्रेसला येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची गरज आहे, असं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT