Ajit Pawar|Sharad Pawar|Rohit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "आमचे सर्व आमदार..." अजित पवारांच्या आमदारांबाबत मोठी माहिती समोर

Ajit Pawar Group MLA's are in touch with Sharad Pawar NCP: दुसरीकडे महायुतीमधील सर्वात मोठा भारतीय जनता पक्षालाही या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. गेल्या वेळी 28 जगा जिंकणाऱ्या भाजपची 9 जागांवर घसरण झाली आहे.

आशुतोष मसगौंडे

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10-15 आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याचे चर्चा कालपासून सुरू होत्या. या सर्व चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देत त्यांचे सर्व आमदार अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (६ जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईतील देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली.

या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 10-15 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, नेत्यांच्या बैठकीनंतर आमच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. यामध्ये आम्ही आमदारांचे म्हणणे ऐकूण घेऊ तसेच त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक कामगिरीचा आढावा घेऊ. आज झालेल्या आमच्या बैठकीत आम्ही विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. आम्ही महायुती म्हणून विधानसभेला सामोरे जाणार आहोत.

यावेळी तटकरे यांना विचारण्यात आले की, तुमचे काही आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत हे खरे आहे का? यावर तटकरे म्हणाले की, यामध्ये कोणतेही तथ्थ्य नाही. जाणीवपूर्वक या अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्या सर्व आमदारांचा दादांवर विश्वास आहे.

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतअजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या (SP) खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला.

दरम्यान राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभेच्या 4 जागा लढवल्या होत्या. यापैकी त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रुपाने रायगडची एकमेव जागा जिंकता आली.

दुसरीकडे महायुतीमधील सर्वात मोठा भारतीय जनता पक्षालाही या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. गेल्या वेळी 28 जगा जिंकणाऱ्या भाजपची 9 जागांवर घसरण झाली आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे शरद पवार यांच्या प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT