AJit Pawar and Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार अन् अजित पवार येणार एकाच मंचावर; दौंड तालुक्यात आहे कार्यक्रम

संतोष कानडे

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार एका कार्यक्रमासाठी एकत्र येणार असल्याची माहिती आहे. दौंड तालुक्यातील शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते, तेव्हा काका-पुतणे एका व्यासपीठावर आले होतं. परंतु अजित पवारांनी शरद पवारांना शिताफीने टाळलेलं. त्यानंतर या दोघांनी पुण्यात एक गुप्तभेट देखील घेतली होती.

आता एका जाहीर कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवार प्रमुख उपस्थितांमध्ये असणार आहेत. २२ ऑक्टोबर रोजी दौंड तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यादेखील कार्यक्रमाला असतील.

अजित पवारांनी २ जुलै रोजी बंड करुन सत्तापक्षाला समर्थन दिलं होतं. त्यांच्यासोबत ४५ आमदार असल्याचं सांगितलं जातं. तर ९ जणांनी सत्तेत मंत्रिपद घेतलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली असतांनाही शरद पवार आणि सुप्रिया सुळे फूट पडली नसल्याचं सांगतात. काही लोकांनी भूमिका घेतली म्हणजे पक्ष फुटला असं म्हणता येत नाही, असं शरद पवार म्हणतात.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यानंतर आता दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश माध्यमाच्या शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोघे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्या प्रतिष्ठानच्या दौंडमधील स्वामी चिंचोली येथील शाळेच्या उद्घाटनप्रसंगी दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT