Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शरद पवार अन् एकनाथ शिंदे एकाच मंचावर; पुण्यातील...

विरोधी पक्षनेते अजित पवारही कार्यक्रमाला उपस्थित राहणार

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील सत्तांतर आणि नाट्यमय घडामोडीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

राज्यातील सत्तांतर आणि नाट्यमय घडामोडी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये दोन वेळा भेट झाली आहे. एमसीएच्या निवडणूकीच्या काळामध्ये आणि नंतर शरद पवार यांच्यावर शस्रक्रिया झाली त्यावेळी रुग्णालयात दोघांची भेट झाली होती. त्यामुळे या जाहीर कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे दोन्ही नेते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष्य लागून असणार आहे.

दरम्यान याच कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हे नेतेही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे पुण्यातील या कार्यक्रमाची चर्चा रंगू लागली आहे. मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT