Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : आजीसारखा नातू! बीडच्या सभेत पवारांनी सांगितली केशरकाकूंची आठवण

संतोष कानडे

बीडः बीडमध्ये आज शरद पवार यांच्या स्वाभिमानी सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. शरद पवारांसह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार या नेत्यांची सभेसाठी उपस्थिती होती. यावेळी भाषणाच्या सुरुवातीला शरद पवारांनी स्व. केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण सांगून काकूंचा नातू संदीप क्षीरसागर यांचं कौतुक केलं.

बीडमध्ये केलेल्या छोट्याशा भाषणामध्ये शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बीडमधल्या सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं. मणिपूरचा मुद्दा आणि नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या भाषणावर त्यांनी सडकून टीका केली.

बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आजी स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्याबाबतीत बोलतांना शरद पवार म्हणाले की, बीडमध्ये निष्ठेच्या बाबतीत कधीच तडजोड केली जात नाही. त्यामुळे अशा निष्ठावान लोकांच्या मागे बीडची जनता उभी राहाते.

शरद पवार म्हणाले की, मला एक जुनी आठवण झाली. त्यावेळी मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होतो. महाराष्ट्राचं नेतृत्व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होतं, आम्ही त्यांच्या विचारांनी काम करत होतो. त्यावेळी काही लोकांनी खऱ्या नेतृत्वापेक्षा वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बीड जिल्ह्याचं नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं.

''त्यावेळी काकूंनी निष्ठेची बाजू स्वीकारली. कुणी काहीही भूमिका घेतली तरी मी नेत्यांवर असलेल्या श्रद्धेसंबंधी तडजोड करणार नाही. काहीही किंमत मोजावी लागली तरी माघार घेणार नाही. तीच परिस्थिती आज संदीप क्षीरसागर यांच्यामुळे बघायला मिळली, याचा आनंद आहे.''

असं म्हणत शरद पवारांनी संदीप क्षीरसागर यांच्या आजी तथा बीडच्या तत्कालीन खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण सांगितलं. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत शरद पवारांना साद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT