Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: एकिकडे अजित पवारांच्या CM पदाची चर्चा तर दुसरीकडे राष्ट्रवादीत मोठ्या बदलांचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेने उधाण आलं आहे.

धनश्री ओतारी

Maharashtra Politics : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विरोधा पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेने उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. भाकरी ही फिरवावी लागते ती जर फिरवली नाही तर करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.(sharad pawar big statement on maharashtra politics NCP Youth )

मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. मुंबईत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

काय म्हणाले शरद पवार?

पक्ष संघटनेत काम करणाऱ्या युवकांची वर्गवारी कशी करायची ते ठरवलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल.

त्यामधून एक नवं नेतृत्व तयार केलं जाईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता विलंब करुन चालणार नाही. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते असंही वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं.

माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे की यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात राजकारण लवकरच बदलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT