Kolhapur Loksabha Election esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election : शरद पवारांची मोठी खेळी, शाहू महाराजांना उतरवणार लोकसभेच्या रिंगणात? म्हणाले, जनतेच्या मनात..

'ज्या ठिकाणी ज्याची ताकद जास्त आहे, त्यानेच ती जागा लढवायची, असा आमचा विचार आहे.'

सकाळ डिजिटल टीम

‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा खऱ्या अर्थाने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी चालवला आहे. ते शाहूंच्या विचाराने कार्य करत आहेत.'

कोल्हापूर : ‘श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी निवडणूक लढवावी, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र, निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी स्वतः मला स्पष्ट सांगितले आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘मात्र, जनतेची इच्छा लक्षात घेऊन त्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, ’असेही ते म्हणाले. खासदार पवार म्हणाले, ‘कोल्हापुरात झालेल्या सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती. सभेमध्ये इथल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्पष्ट मते मांडली. तरुण पिढी पुढे येत आहे. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) कोणती जागा कोणी लढवायची, ते आम्ही समविचारी पक्ष एकत्र येऊन ठरवू, असं त्यांनी सांगितलं.

ज्या ठिकाणी ज्याची ताकद जास्त आहे, त्यानेच ती जागा लढवायची, असा आमचा विचार आहे. एकत्र बैठक घेऊन याबद्दलची चर्चा आम्ही करणार आहोत.’ लोकसभेला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देणार का? या प्रश्नावर पवार म्हाणाले, ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा खऱ्या अर्थाने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी चालवला आहे. ते शाहूंच्या विचाराने कार्य करत आहेत.

त्यांनी निवडणूक लढवावी, अशी सर्वांची इच्छा आहे, मात्र मी निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी स्वतः मला सांगितले आहे. त्यातूनही त्यांनी जनतेची इच्छा लक्षात घेऊन निवडणूक लढवण्याचे ठरवले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

बाजीराव खाडे यांना लोकसभेची उमेदवारी द्या

कुंभी आणि कासारी परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने खासदार शरद पवार यांना निवेदन देऊन काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची मागणी केली. ‘बाजीराव खाडे यांनी २५ वर्षे काँग्रेसचे निष्ठेने काम केले आहे. त्यांनी सहकार क्षेत्रात चांगले काम केले आहे.

कुंभी-कासारी परिसरातील ५००० कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खाडे यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही काँग्रेसकडे लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागणार आहोत. महाविकास आघाडीकडून बाजीराव खाडे यांना उमेदवारी मिळावी म्हणून आपण पाठबळ द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

संध्यादेवी कुपेकर, नरकेंनी घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंदगडच्या माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर व ‘गोकुळ’ चे माजी अध्यक्ष अरुण नरके, त्यांचे पुत्र डॉ. चेतन नरके यांनी श्री. पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. डॉ. चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. या पा‍र्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे.

गर्दी पाहून त्यांना कळलेच असेल

सभेला गर्दी होणार नाही, अशी चेष्टा काहींनी केली होती. याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, ‘सभेला मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. त्यावरून त्यांना कळले असेलच. आता वेगळे सांगण्याची गरज नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT