Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

Sharad Pawar: स्पिड ब्रेकरवर शरद पवार यांची गाडी स्लो झाल्यानंतर मागे वेगात असलेल्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. यामध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Sandip Kapde

Sharad Pawar: जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव जवळ शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या. अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. पण वाहनांचे मोठे नुकसान झाले. शरद पवार चोपडा येथून सभा संपवून भुसावळकडे जात असताना हा अपघात झाला आहे. ताफ्यामाग्या चालणाऱ्या गाड्या धडकल्या. यामध्ये चार गाड्यांचे नुकसान झाले आहे.

यापूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला जाणारे हेलिकॉप्टर महाराष्ट्रातील महाडमध्ये कोसळले. वैमानिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुषमा अंधारे थोडक्यात बचावल्या?

हेलिकॉप्टर अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये चढण्याआधी हेलिकॉप्टर कोसळले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी 9.30 वाजता सुषमा अंधारे या बारामतीच्या दिशेने जात होत्या.

यापूर्वी जयंत पाटील देखील त्याच हेलिकॉप्टरने मुंबईला गेले होते. आज दिवसभर अपघाताच्या घटना घडत आहेत.

पुण्याहून रावेरला जाणारी बस घाटात कोसळली -

पुण्याहून रावेरला जाणारी बस घाटात कोसळली. संभाजीनगरच्या घाटात बस कोसळली. यामध्ये ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: स्कूटीवरून दोन तरूण आले, कारवर पेट्रोल टाकून आग लावली अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Jalgaon News : कर्जमाफीचा शब्द पाळला! पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत, तर खडसेंकडून सरकारवर टीकास्त्र

Accident: मालगाडीचा मोठा अपघात! रुळ उखडले अन् चाकेही वेगळी झाली; रेल्वेचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

SCROLL FOR NEXT