sharad pawar sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात गरजेनुसार निर्बंध वाढवा : शरद पवार

लोकांची गर्दी आणि वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त करताना राजकीय व अराजकीय कार्यक्रम थांबविण्याबाबत पवार यांनी बजावल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना संसर्ग, रुग्णसंख्या, त्यातील वाढ आणि परिणामांची माहिती घेत खबरदारी म्हणून योग्य वेळी, योग्य निर्णय घ्यावा व गरज असेल तर निर्बंध वाढविण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारला केल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी सांगितले.

लोकांची गर्दी आणि वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त करताना राजकीय व अराजकीय कार्यक्रम थांबविण्याबाबत पवार यांनी बजावल्याचेही सांगण्यात आले. पवार यांच्या सूचनेनंतर आता राज्य सरकार तातडीने पावले उचलून उपाय करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी पवार यांची भेट घेतली. राज्यातील या आजाराची प्रमुख्याने रुग्णवाढीची कारणे, त्याचे प्रमाण, सरकारने केलेल्या उपाययोजना, सरकारी, खासगी रुग्णांतील उपचार व्यवस्था, संभाव्य निर्बंध आणि त्याची परिणामकारकता या बाबींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

तेव्हा, हा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या बाबी करण्याकडे पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले. परंतु, उपायांमुळे लोकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना पवार यांनी केल्याचे समजते.

पवार यांच्या भेटीतील चर्चेची माहिती टोपे यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, ‘‘रुग्णसंख्येपासून रुग्णालये, मनुष्यबळ, औषधे आणि सध्याचे निर्बंध, त्याच्या अंमलबजावणीची माहिती घेतल्यानंतर यापुढच्या काळात आवश्यकता वाटली तर काही निर्बंध लागू करण्याची सूचना पवार यांनी केली आहे. लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याबाबत चर्चा झाली आहे.’’

मुंबईसह काही शहरांत रुग्ण वाढत असतानाच मुंबईत ‘कोरोनायोद्धांना संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. सध्याची स्थिती पाहता आरोग्य यंत्रणांकडे पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी सांगितले.

व्यवहार पूर्णपणे थांबविणार नाही

नव्याने निर्बंध लादताना व्यवहार पूर्णपणे थांबविण्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासावर बंधने नसतील, मात्र लोकांनी विनाकारण प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे. तूर्तास तरी जिल्हांतर्गत प्रवासावर कोणत्याही स्वरूपाची बंदी नसेल, असे टोपे यांनी सांगितले.

कोणीही बंधने तोडू नयेत

कोरोनाचा कहर सुरूच असतानाच राज्याच्या काही भागांत अजूनही निवडणुकांचा प्रचार, सभा, मेळावे होऊन लोकांची गर्दी होत असल्याबाबत पवार यांनी टोपे यांच्याकडे चिंता व्यक्त केली. त्यामुळे यापुढे राजकीय कार्यक्रम न घेण्याची सूचना पवार यांनी केल्याचे टोपे यांनी सांगितले. अशा स्थिती कोणीही बंधने तोडू नयेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT