Sharad Pawar vs Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

'शिवरायाचं राज्य प्रत्येकाच्या मनात आहे, हे कुणी सांगायची गरज नाही'

सकाळ डिजिटल टीम

'300-400 वर्षांनंतरही सामान्य माणसाच्या अंतकरण:त छत्रपती शिवाज महाराजांचं नाव अढळ आहे.'

कोल्हापूर : या देशात अनेक राजे होऊन गेलेत. चंद्रगुप्त मौर्यचं राज्य होऊन गेलं, मोगलांचं राज्य होऊन गेलं, अदिलशाहाचं राज्य येऊन गेलं. अनेकांची राज्य येऊन गेली. पण, 300-400 वर्षांनंतरही सामान्य माणसाच्या अंतकरण:त छत्रपती शिवाज महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव अढळ आहे. शिवाजी महाराजांचं रयतेचं राज होतं, ते हिंदवी स्वराज होतं, त्यामुळं शिवरायाचं राज्य प्रत्येकाच्या मनात कायम आहे, हे कुणी सांगायची गरज नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केलीय. ते कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या सभेत बोलत होते.

शरद पवार पुढं म्हणाले, महात्मा फुले, शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची नावं का नाही घ्यायची? असा सवालही त्यांनी सभेत उपस्थित केला. सामान्य माणसाच्या अंतकरण:त छत्रपती शिवाज महाराजांचं नाव आजही अढळ आहे. या महाराष्ट्र भूमीत शाहू महाराजांनी अनेकांशी संघर्ष केलाय. शाहूंनी सामान्यांचा कधीच कैवार सोडला नाही. तसेच देशासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेकरांचं योगदान देखील खूप मोठं आहे. पण, आपण आजही काही लोक त्यांचा व्देष करतात, हे चुकीचं आहे. देशाचं भविष्य आंबेडकरांनी उज्वल केलंय. ज्यांना हे महापुरुष समजले नाहीत, त्यांना महाराष्ट्र काय समजणार? असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जोतिबा फुलेंनी सांगितला, असंही त्यांनी आवर्जुन स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT