Sharad Pawar Narendra Modi Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Video : ''मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या मोदींनी फडणवीसांचा सल्ला घ्यावा'' शरद पवारांकडून खरपूस समाचार

संतोष कानडे

बीडः अजित पवारांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा नव्याने पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवल्यात झाली होती. आज दुसरी सभा बीडमध्ये झाली आहे.

बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या सभेचं आयोजन केलं होतं. या स्वाभिमानी सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख आणि बीड जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भाषणादरम्यान शरद पवारांनी मणिपूरच्या मुद्यावरुन केंद्र सरकारला धारेवर धरलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाबद्दल बोलतांना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी पुन्हा येईन, असं म्हटलं आहे. परंतु त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा सल्ला घ्यावा.

काय म्हणाले शरद पवार?

१५ ऑगस्टचं भाषण करत असताना पंतप्रधान म्हणाले, मी पुन्हा येईन. माझी त्यांना एकच विनंती आहे की, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनीही सांगितलं होतं पुन्हा येईन. माझी विनंती आहे की, पंतप्रधानांनी देवेंद्रचं मार्गदर्शन घ्यावं.

''पुन्हा येईन म्हणाले, ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही तर खालच्या रँकवर. आता पंतप्रधान म्हणतात मी पुन्हा येईन. त्यामुळे देवंद्रचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावं. आज आहे त्यापेक्षा खाली कुठे जायचं आहे त्याबद्दल विचार करावा.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT