Sharad Pawar News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'तुझा दाभोळकर केला जाईल', शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी

धनश्री ओतारी

राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar death threat to Maharashtra Politics)

शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला दाखल झाल आहे. (Latest Marathi News)

'भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल. अशा स्वरूपाची धमकी ट्विटर द्वारे देण्यात आली आहे.  सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे.(Latest Marathi News)

गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे

मला व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यामध्येही आक्षेपार्ह मेसेज आहेत. ज्या पद्धतीने धमकी देण्यात आली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. संभाजी नगर, अहिल्यानगर आणि आता कोल्हापूरमध्ये अशी घटना घडलेल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. (Latest Marathi News)

या सर्व घडामोडीदरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त ट्विट केले आहे.

निलेश राणें पवारांसदर्भात वादग्रस्त ट्विट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT