Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार दिल्लीत जाणार; राष्ट्रवादीच्या संमेलनात राजकीय खलबतांचे संकेत

शरद पवार यांनी कालच पुण्यातील भिडेवाडा आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर आता लवकरच ते दिल्लीला जाणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या टीका, केतकी चितळे प्रकरण, अजूनही ताजं असलेलं भिडे वाडा आणि दगडूशेठ हलवाई गणपती भेट प्रकरण या सगळ्यानंतर आता शरद पवार दिल्लीत जाणार आहेत. निमित्त आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं संमेलन. (NCP chief Sharad pawar to visit Delhi NCP youth congress meeting)

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ट्विट करत या दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. ट्विटमध्ये शरद पवार म्हणतात, "देशात धर्म आणि सांप्रदायाच्या नावावर ध्रुवीकरणाचा प्रयत्न एका विशिष्ट विचारधारेचे लोक करत आहेत. यामुळे समाजात तणाव निर्माण होतो. त्यामुळे अशा घातक शक्तींच्या विरोधात उभं राहण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निर्धार केलेला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला भेटून अशा नाजूक वेळी युवकांना मार्गदर्शन करण्याचं आवाहन केलं. याबद्दल तरुण वर्गात जनजागृती करण्यासाठी देशाच्या राजधानीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक मोठं संमेलन घेणार आहे. या कार्यक्रमात सामील होण्यासाठीचं निमंत्रण तरुण कार्यकर्त्यांनी दिलं आहे. धार्मिक - जातीय ध्रुवीकरण लोकशाहीसाठी धोकादायक आहे. यासाठी याच्या विरोधात उभे राहणाऱ्या आमच्या तरुणांचं मनोबल वाढवण्यासाठी मी हे निमंत्रण स्वीकारत आहे".

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत जाणार आहेत. या आधीही ममता बॅनर्जींसह शरद पवार आणि इतर विरोधकांनी एकत्र येत ध्रुवीकरण करणाऱ्या शक्ती आणि भाजपाविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक खलबतं झाली. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जात आता शरद पवार कोणती नवी रणनीती आखणार याकडे लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

प्रसिद्ध युट्यूबरचा 1.20 मिनिटाचा MMS लीक? व्हायरल व्हिडिओची पोलखल: सत्य समोर

SCROLL FOR NEXT