Sharad Pawar Faction Symbol  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Faction Symbol : 'वटवृक्ष' चिन्ह शरद पवार गटाला देऊ नका; विश्व हिंदू परिषदेने का केली निवडणूक आयोगाकडे मागणी?

शरद पवार विरुद्ध अजित पवार सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव, पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे गेल्याने शरद पवार गटाला नवीन नाव मिळालं आहे.

संतोष कानडे

मुंबईः शरद पवार विरुद्ध अजित पवार सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव, पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे गेल्याने शरद पवार गटाला नवीन नाव मिळालं आहे.

शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती. त्यांपैकी एक नाव त्यांना मिळालं. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' असं आहे.

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव दिलं मात्र अद्याप चिन्ह दिलेलं नाही. शरद पवार गटाकडून वटवृक्ष या चिन्हाची मागणी केल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या लोगोला विरोध केलाय.

मागील ६० वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेचा नोंदणीकृत लोगो वटवृक्षाचा आहे. त्यामुळे हा लोगो कुणालाही दिला जावू नये, अशी मागणी त्यांनी केलीय. विहिंपचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे.

परांडे म्हणाले की, निवडणूक आयोगात एनसीपीच्या नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे. या प्रोसेसमध्ये त्यांना जो लोगो दिला जातोय किंवा ऑफर केला जातोय तो वटवृक्षाचा लोगो आहे. परंतु मागच्या ६० वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेचा हा नोंदणीकृत लोगो आहे. विहिंपने धार्मिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाला हा लोगो दिला तर संभ्रम निर्माण होईल. म्हणून निवडणूक आयोगाने कुणालाही वटवृक्षाचा लोगो देऊ नये, अशी मागणी मिलिंद परांडे यांनी केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. मात्र यापूर्वीच अजित पवार गटाने मागणी केली आहे की, विरोधी पक्षाकडून प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी मिळावी. तसं कॅव्हेट दाखल करण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

Pune News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले; पुण्यातील घटना

Pune News : प्रभाग रचनेवर संताप; पुण्यात नागरिकांचा घोषणाबाजीचा धडाका

Neelam Gorhe : शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT