Sharad Pawar Reaction After ED interrogation to Nawab Malik  esakal
महाराष्ट्र बातम्या

मलिकांवरील ईडी कारवाईनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज ईडीने ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत. सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. (ED raided on Nawab Malik House) या साऱ्या प्रकारावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं मत मांडलं आहे.

शरद पवार यांनी म्हटलंय की, यामध्ये काही नवीन आहे. आज ना उद्या होणारच होतं. जाहीरपणे अनेक विषयांवर नवाब मलिक सतत विरोधात बोलत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. नवाब मलिकांवर ईडी कारवाई करणार याची पुसटशी कल्पना होतीच. ते आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. परंतु हा सत्तेचा गैरवापर होतोय. जे केंद्र सरकारविरोधात बोलतात अथवा केंद्रीय यंत्रणांबाबत बोलतात, त्यांना नोटीस दिली जात आहे. त्यांची चौकशी होते. सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय, असं शरद पवार यांनी म्हटलंय. (Sharad Pawar Reaction After ED interrogation to Nawab Malik)

पुढे ते म्हणाले की, मुस्लीम असल्याने दाऊदशी संबंध वगैरे आरोप केले जात आहेत. याआधी माझ्यावरही अशाप्रकारचे अनेक आरोप झाले आहेत. पण सिद्ध करू शकले नाहीत, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

जाणून घ्या घटनाक्रम

  • पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले .

  • त्यानंतर १ तास मलिक यांची चौकशी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी केली

  • चौकशी केल्या नंतर ०७:३० वाजता नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय

  • नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात घेऊन गेले असल्याची माहिती आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT