Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'मी अजूनही सांगतोय...', धनुष्यबाणावर प्रश्न विचारताच शरद पवार संतापले

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही, नवीन चिन्ह घेऊन त्यांना लोकांसमोर जावे लागेल आणि लोकही त्यांचं नवीन चिन्ह मान्य करतील, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला मिळाल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. एकीकडे शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचा नाव आणि चिन्ह मिळाल्यामुळे शिंदे गटात मोठा उत्साह दिसून येत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ओपन जीपमधून मातोश्रीबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या विषयावर पुन्हा बोलणं टाळलं आहे. ते बोलताना म्हणाले की, मी या वादात पडणार नाही, मी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिलं. त्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. त्यावेळी शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना 'निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही, नवीन चिन्ह घेऊन त्यांना लोकांसमोर जावे लागेल आणि लोकही त्यांचं नवीन चिन्ह मान्य करतील' असं म्हंटलं होतं.

पुन्हा एकदा शरद पवार यांना याबाबत विचारलं असताना त्यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही, मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केल्याचं म्हणत शरद पवार यांनी याबाबत जास्त काही बोलणं टाळलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT