NCP Party and Symbol Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Party and Symbol: निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गट घेणार मोठा निर्णय? दिल्लीत हालचाली

NCP Party and Symbol: राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाच्या लढाईत अखेर निवडणूक आयोगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाच्या लढाईत अखेर निवडणूक आयोगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला. अजित पवार यांचा गट हाच खरा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असल्याचे सांगत आयोगाने ‘घड्याळ’ हे पक्ष चिन्ह देखील त्यांना बहाल केले आहे. आयोगाच्या या निवाड्याचे अजित पवार यांच्या गटाने स्वागत करत राज्यभर जल्लोष केला असून शरद पवार गटाने मात्र हा लोकशाहीचा खून असल्याची घणाघाती टीका केली.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला आता स्वतःसाठी पक्षाचे वेगळे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला सुचवावे लागेल. आयोगाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी शरद पवार गटाने चालविली आहे. दरम्यान पुढील रणनीती आखण्यासाठी शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. निकाल विरोधात जाताच दिल्लीत शरद पवार गटाच्या वकिलांची बैठकी सुरू झाली आहे. त्यामुळे उद्या सकाळी शरद पवार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार गटाने आपला पक्ष आणि चिन्ह ठरवण्यासाठी ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शरद पवार (Sharad pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे. शरद पवारांनी पक्ष स्थापन केला, तो वाढवला. ज्यांना राजकारणात आणले त्यांनीच पवारांना धोका देत पक्ष पळवला. या अन्यायाविरोधात कोर्टात जाणार आहोत, असे सुळे म्हणाल्या आहेत. त्यानंतर आता दिल्लीत शरद पवार गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलांची बैठक सुरू झाली आहे.

शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडही ठरवली रद्दबातल

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवडही आयोगाने रद्दहबातल ठरविताना यापुढे त्यांना कोणतेही निर्णय घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी २ जुलैला अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत थेट मंत्रिपदाचीच शपथ घेतल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता.

यामुळे शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थेट दोन उभे गट पडले होते. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची बाजू ऐकल्यानंतर आज १४१ पानांचा निर्णय जाहीर केला असून यात शरद पवार यांची सप्टेंबर- २०२२ मध्ये झालेली निवडच रद्दबातल ठरविण्यात आली आहे. १० व ११ सप्टेंबर २०२२ मध्ये दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाअधिवेशन झाले होते. या अधिवेशनात एकमताने शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. परंतु, निवडणूक आयोगाने ही निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेप्रमाणे झाली नसून या महाअधिवेशनाला उपस्थित असलेल्या लोकांचा कोणताही सबळ पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Israel Gaza Conflict: गाझावर पुन्हा हल्ल्याची तयारी; इस्राईलचा पवित्रा, हमासचे सक्रिय गट लक्ष्य करणार

Krishna River Flood Sangli : कृष्णा नदीचे पाणी सांगलीत घुसले, पाणी पातळी गेली ४० फुटांवर; कोयनेचा विसर्ग स्थिर, चांदोलीतून कपात

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून तब्बल 1 लाख 41 हजार 600 क्युसिक विसर्गाने पाणी भीमा नदीत केला

SCROLL FOR NEXT