Sanjay Shirsath 
महाराष्ट्र बातम्या

पक्ष फुटलेला नाही, हे शरद पवारांनी आधीच सांगितलं, आमचं ताणलं म्हणून तुटलं; शिरसाठांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील गुप्तभेटीमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय शरद पवार यांनी देखील भेटीला कौटुंबिक भेट असल्याचं म्हटलं. तर अजित पवार यांनी देखील तेच सांगितलं. मात्र शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी वेगळाच दावा केला आहे.

संजय शिरसाठ म्हणाले की, शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं की, त्यांचा पक्ष फुटलेला नाही. त्याचा तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा. मात्र आमचं जास्त ताणलं म्हणून तुटल्याची कबुली संजय शिरसाठ यांनी दिली. तसेच भविष्यामध्ये महाविकास आघाडी टिकणार नसल्याचा दावाही शिरसाठ यांनी केला.

दरम्यान भाजपसोबत जाणाऱ्यांबाबतच्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिरसाठ म्हणाले की, कोणाच्या डोक्याला बंदूक लावून नेल असेल तर बंदुकीने नेलेले लोक जास्त काळ टीकत नाही. प्रेमाने नेलेले लोक जास्त काळ राहतात.

नवाब मलिकांची अजित पवार गटाच्या नेत्यांनी भेट घेतली. त्यावर शिरसाठ म्हणाले की, ते आजारी व्यक्तीला भेटायला गेले होते. मलिक हे आजारी आहेत. त्यांना राजकारण कशाला पाहिजे. आराम करावा. अल्लाहचं नाव घ्याव, असंही शिरसाठ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT