NCP Chief Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'मनात संभ्रम ठेवू नका...', भाजपसोबत जाण्याबाबत शरद पवारांचं दिल्लीत मोठं वक्तव्य

दिल्लीत शरद पवार यांनी पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर ८ नेत्यांनी शिवसेना-भाजपच्या सरकारला समर्थन दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती, त्यावर जयंत पाटील यांनी मी कोणाला भेटलो नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

त्यानंतर काल दिल्ली सेवा विधेयक काल राज्यसभेतही मंजूर झालं आहे. पण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संभ्रमी खेळी दिसून आली होती. कारण यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून कुठलाही व्हिप काढण्यात आला नव्हता. तसेच शरद पवार या विधेयकाला विरोध करण्यासाठी सभागृहात हजर होते. पण प्रफुल्ल पटेल यांनी दांडी मारली. पवार हजर राहतील हे अपेक्षित होतं पण पटेल गैरहजर राहिल्यानं वेगळ्याचं चर्चेला तोंड फुटलं आहे.

त्यानंतर शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत केंद्राकडून दबाव आहे. पण काहीही झालं तरी आपण पुन्हा सगळं उभा करू असं शरद पवार दिल्लीत पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना म्हणाले आहेत.

'काहीही झालं तरी आपण तडजोड करणार नाही, आपल्याला भाजप विरोधातच लढायचं आहे. अशी भूमिका शरद पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केली आहे. मनात कुठेही शंका आणू नका, मी भाजपसोबत जाणार नाही, आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा', अशा सूचना शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगमनंतर बॉलिंगमध्येही कमाल

IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Video

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Pune Water Protest: पुण्यात तीव्र पाणीटंचाई; काँग्रेसचे रिकाम्या घागरींसह महापालिकेत हंडा आंदोलन

MLC Election: ठाकरे गटात फूट; खासदारांच्या बंडाची धग! अशातच महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT