Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: "चंद्रकांत पाटलांना नक्की कळेल काय घडलं ते पण..."; अजितदादा भेटीवरून शरद पवारांचा टोला!

Sandip Kapde

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज माढा दौऱ्यावर आहेत. यावेळी कापसेवाडीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकांवर देखील त्यांनी भाष्य केले. तसेच शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.  

दोन पवारांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. दोन पवार भेटले की घडल्यावर समजेल काय घडलं ते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. शरद पवार म्हणाले, चंद्रकांत पाटलांना नक्की कळेल काय घडलं ते पण निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. 

पंतप्रधान मोदींना किंमत चुकवावी लागेल-

शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी ज्याप्रकारे गोष्टी मांडत आहेत. त्याप्रकारचे राजकारण आम्ही कधी पाहीले नाही. मी जवाहर लाल नेहरू यांची भाषणे एकली आहेत. इंदिरा गांधी, शास्त्रीजी यांची भाषणे एकली. त्यावेळी प्रधानमंत्री कोणत्याही राज्यात गेले तर त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद बोलले नाहीत.

मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत जे दुसऱ्या राज्यात जातात आणि भाजपसोडून दुसरा मुख्यमंत्री असला तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ला करतात. चुकीचे हल्ले करतात. मात्र आता होत असलेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच पंतप्रधान मोदींना किंमत चुकवावी लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

राज्यकर्त्यांची पातळी घसरली-

राम मंदिरात मोफत प्रवेश देऊ, असं देशाचे गृहमंत्री प्रचार करतात, मंदिरात जायला पैशे लागतात का? राज्यकर्त्यांची पातळी अशा स्तरावर गेली आहे की त्याची चर्चा न केलेली बरी, असे शरद पवार म्हणाले.

दिवाळीनंतर लोकसभा जागावाटपासंदर्भात बैठक-

महाराष्ट्रात ४८ लोकसभेच्या जागावाटपाबाबत शरद पवार म्हणाले, याबाबत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मित्र पक्ष मिळून चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे की आम्ही एकत्रपणे लोकांसमोर नवा पर्याय ठेऊ. दिवाळीनंतर यासंदर्भात बैठक घेऊ.  

प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत घेणार का?

प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार म्हणाले, मी माझी भूमिका मांडली आहे. इतर पक्षांना आम्ही आग्रह करु आणि त्यांना सांगू की काहीतरी थोड मागे पुढं सरकाव लागेल.

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष-

माढ्यात भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. बबनदादा अजित पवार गटासोबत आहेत. तर रणजित शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे माढा लोकसभा आणि विधानसभेचं गणित काय?, यावर शरद पवार म्हणाले, "माढा लोकसभा  सोलापूर लोकसभा किंवा सोलापूर जिल्ह्यातील कुठलीही विधानसभेची जागा असो. यासाठी निती स्वच्छ आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आम्ही एकत्र लढवणार आणि जिंकणार."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मुंबईत मुसळधार पावसाचा आढावा, उपमुख्यमंत्री शिंदे यांची आपत्कालीन कक्षास भेट

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Tejashwi Yadav : ''महाआघाडी 2029मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार'' ; तेजस्वी यादव यांनी केली घोषणा, मात्र...

Mumbai Rain Update: डोंबिवली रस्ते पाण्याखाली, खासदारांच्या घरातही पाणी शिरलं, पाहा परिस्थिती

Asia Cup 2025 India Squad: शुभमन गिलमुळे यशस्वी जैस्वालवर अन्याय? सूर्यकुमार यादवने सांगितलं का केलं त्याला उपकर्णधार

SCROLL FOR NEXT