महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'कर्नाटकच्या निकालामुळे निवडणुका लांबणीवर पडू शकतात', आगामी निवडणुकांबाबत पवारांचं भाकीत

संतोष कानडे

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुका लांबणीवर पडू शकतात, असं विधान केलं आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा पुनरुच्चार शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या चौकशीच्या निमित्ताने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सात तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. याविषयी बोलतांना शरद पवार म्हणाले की, देशात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या १० लोकांची चौकशी झालेली आहे. परंतु निष्पन्न काही झालं नाही. अनिल देशमुख यांच्यावर अतिरंजीत आरोप झाले. मात्र त्यातून काहीही पुढे आलेलं नाही. चुकीचं काम करणाऱ्यांना संरक्षण आणि चांगलं काम करणाऱ्यांना त्रास, असं सुरु झालं असल्याचा ठपका शरद पवारांनी ठेवला.

पुढे बोलतांना पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांच्याविरोधामध्ये किती तक्रारी आहेत, याचीही माहिती सरकारने घेतली पाहिजे. मलिकांनी वानखेडे यांच्याबद्दल जे सांगितलं होतं, ते आता खरं ठरलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेकांच्या चौकश्या झाल्या. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या चौकश्या होत आहेत. यावरुन सरकारची भूमिका लक्षात येते.

कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना पवार म्हणाले की, राज्यातल्या निवडणुका कधी होतील, हे मला सांगता येणार नाही. परंतु आगामी निवडणुका लांबणीवर पडू शकतात. महाविकास आघाडीमध्ये कसलाही वाद नसून तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून जागावाटपाबाबत निर्णय घेतील, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी दोन हजारांच्या बंद केलेल्या नोटेवरुन केंद्राला धारेवर धरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT