uddhav thackeray sharad pawar file photo
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : उद्धव ठाकरे परदेशात असतांना शिंदे-पवार भेट; 40 मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली?

संतोष कानडे

मुंबईः एकीकडे उद्धव ठाकरे परदेशात असतांना शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पवार हे पहिल्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने राजकीय अर्थ काढले जात आहेत.

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रितपणे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं जातं आहे. भाजप नेते राम कदम यांनी बोलतांना सांगितलं की, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. एका पक्षाचा प्रमुख राज्याच्या प्रमुखाच्या भेटीला गेला आहे. त्यामुळे यातून दुसरा काहीही अर्थ नाही.

उभय नेत्यांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाली आहे. सुरुवातीला हे नेते माध्यमांना एकत्रित बोलणार असल्याची माहिती होती. मात्र भेटीनंतर शरद पवार निघून गेलेले आहेत.

मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण झाली. त्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचंही सांगितलं जातं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवारांनी व्यक्तिगत कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यातून दुसरा काही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. ही भेट राजकीय नव्हती, असं मुनगंटीवार म्हणाले.

सायंकाळी अचानकपणे शरद पवार शिंदेंच्या भेटीला गेल्याने सर्वच माध्यमांच्या नजरा उंचावल्या. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. २०१९नंतर राज्यात कधी काय होईल, याचा नेम नाही. त्यामुळे अचानकपणे सगळेच जण स्तब्ध झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT