Sharad Pawar - Uddhav Thackeray file photo
महाराष्ट्र बातम्या

'वर्षा' वर ठाकरे-पवारांमध्ये दीड तास बैठक; चर्चांना उधाण

बैठकीमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून वातावरण तापलेले असताना आज मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली आहे. त्यामुळे अनेक चर्चांनी दोर धरला आहे. दरम्यान, बैठकीमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. (Sharad Pawar Udhav Thackeray Meet )

दरम्यान, उद्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. यापूर्वी पार पडलेल्या सभांमध्ये राज ठाकरेंनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर जर हे भोंगे काढण्यात आले नाही तर, मशिदींसमोर पाच वेळस हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठन केली जाईल असादेखील इशार राज यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच ढवळून निघाले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवासांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्षात अशी बैठक किंवा भेट पाहण्यात आलेली नव्हती. त्यानंतर आज थेट या दोन्ही नेत्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी तब्बल दीड तास बैठक पार पडल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना आणि तर्क वितर्कांना उधाण आले असून, भेटीदरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT