Jayant Patil Vs Rohit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा पडणार फूट? जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार कलगीतुरा का रंगला.. जाणून घ्या सत्तेची लढाई

Jayant Patil Vs Rohit Pawar: शरद पवार यांच्या राष्ट्रीवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर राजकीय वर्तुळाता याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपसह माहायुतीला जबरदस्त धक्का बसला. तर काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाने दमदार कामगिरी करत तब्बल 30 जागा जिंकल्या.

असे असले तरी माविकास आघाडीमध्ये कमी जागा जिंकल्या असल्या तरी स्ट्राईक रेटच्या दृष्टीने विचार केल्यास पवार यांची राष्ट्रवादी सर्वात यशस्वी ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण त्यांनी मित्रपक्षांपेक्षा कमी म्हणजेत 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवला.

पवारांच्या राष्ट्रवादीत या विजयानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

या सर्व घडामोडींमुळे एकदा फुटलेली राष्ट्रावादी पुन्हा फुटणार का? अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.

कशी झाली वादाला सुरूवात?

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा विजयी उमेदवारांच्या अभिनंदनाच्या फ्लेक्सवर जयंत पाटील यांचा 'विजयाचे सेनापती' असा उल्लेख करण्यात आला होता.

दरम्यान हे फ्लेक्स व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली. त्याचबरेबर पक्षातील वाद चव्हाट्यावर आले. दरम्यान काही कार्यकर्त्यांनी तर प्रदेश पातळीवरील नेतृत्त्व बदलण्याचीही मागणी केली होती.

काय म्हणाले रोहित पवार?

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 10 जून रोजी आहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये राष्ट्रवादीच्या विजयी खादारांचा विशेष सत्कार आयोजित केला होता.

या कार्यक्रमात बोलताना रोहित पवार यांनी 'विजयाचा सेनापती' अशा आशयाच्या फ्लेक्सवरून जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. रोहित पवार म्हणाले, "राष्ट्रवादीला मिळालेला हा विजय सांघिक आहे. नाहीतर मीसुद्धा म्हणेन मी किंगमेकर आहे, मी सेनापती आहे. हा विजय मिळवणे हे एक दोन सेनापतींचे काम नव्हते. हे यश मिळाले आहे ते तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे. कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही."

जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

जयंत पाटील हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी फुटण्यापूर्वीही अनेक नेत्यांना जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर नको होते. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कोणाला नको आहेत, का अशी चर्चा त्यांनी आज केलेल्या विधानामुळे पुन्हा सुरू झाली आहे.

आहिल्यानगरच्या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण झाले. त्यावेळी पाटील म्हणाले, " मी पक्षाचा अध्यक्ष आहे, यापूर्वी अनेकांनी माझे महिने अनेकांनी झाले आहेत. पण आता इथून पुढे माझे चार महिने मोजू नका, मी सगळे व्यवस्थित करतो. आणि ट्विटरवर जाहीरपणे बोलायचे जरा बंद करा. जर जयंत पाटलांची काही तक्रार असेल तर ती पवार साहेबांकडे करा. ते जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल. पण जाहीर बोलू नका.

"पक्ष एकाची संपत्ती नसून, महाराष्ट्रातील लाखो लोकांंची संपत्ती आहे."असे म्हणत पक्षाबाद्दल जाहीरपणे बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जयंत पाटील यांनी इशारा दिला."

पडसाद

शरद पवार यांच्या राष्ट्रीवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर राजकीय वर्तुळाता याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

इतकेच नव्हे तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह महायुतीतील पक्ष पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका करत आहेत.

दरम्यान या सर्व घडामोडींवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आमच्या पक्षात प्रत्येकजण उघडपणे बोलू शकतो. आमच्या पक्षात किती लोकशाही आहे. उलट तुम्ही आमच्या पक्षातील लोकशाहीचे कौतुक करायला पहिजे."

अशी प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे यांना हा पक्षांतर्गत वाद झाकून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील वाटचाल कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT