Sharad Pawar NCP esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेस'कडून 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस; 48 तासांमध्ये उत्तर देणं बंधनकारक

संतोष कानडे

मुंबईः अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे ३५ पेक्षा जास्त आमदार अजित पवार गटाकडे असल्याचं सांगितलं जात आहे. बंडानंतर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

आज अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांना खातेवाटप झालेलं आहे. दुसरीकडे शरद पवार गटाच्या पक्षाचे व्हिप जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या १२ आमदारांना नोटीस पाठवलेली आहे. ५ जुलै रोजीच्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहून पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. आमदारांना उत्तर देण्यासाठी ४८ तासाचा अवधी उरला आहे.

'या' आमदारांना नोटीस

सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवंत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रकपुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे; या आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली आहेत. यामध्ये पहिलं कृषी, दुसरं मदत आणि पुनर्वसन आणि तिसरं अन्न आणि औषध प्रशासन. या खात्यांचे मंत्री अनुक्रमे धनंजय मुंडे, अनिल पाटील आणि धर्मरावबाबा आत्राम हे असतील. तर भाजपकडून सहा खाती गेली आहे. यामध्ये अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, क्रीडा, महिला आणि बालकल्याण या खात्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT