sharad pawar nitin gadkari esakal
महाराष्ट्र बातम्या

गडकरींच्या कामामुळे विकासाला गती; पवारांकडून गडकरींचं कौतुक

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : विकासात रस्ते महत्वाचे असून नितीन गडकरींच्या कामामुळे विकासाला गती मिळत आहे. तसेच गडकरींच्या कारकीर्दीत रस्ते दुपट्टीने वाढले, जगभरातील रस्त्यांचा अभ्यास करुन अधुनिक रस्ते गडकरींनी देशात तयार केले असे सांगत शरद पवारांकडून नितीन गडकरींचं कौतुक करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, (shivsena) भाजप,(BJP) राष्ट्रवादी (NCP) व कॉँग्रेस (Congress) पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत.

दोन मातब्बर नेत्यांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती; पवार-गडकरी एकाच मंचावर

जिल्ह्यात पवार व गडकरी या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना सोबत घेण्यात आले होते. आता नगरमध्ये होणाऱ्या अशाच एका कार्यक्रमात गडकरी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार एका व्यासपीठावर येत आहेत. राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पवार यांना बोलविण्याची सूचना स्वत: गडकरी यांनीच केल्याचे सांगण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT