महाराष्ट्र बातम्या

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

''लहान कुटुंबातला, लहान समाजाला एक उदयोन्मुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरुन विरोधी पक्षनेते पदाची जबाबादीरी दिली होती.. लोकांची नाराजी होती तरीही जबाबदारी दिली. तेच आता माझ्यावर व्यक्तिगत आणि कुटुंबावर हल्ला करत आहेत.''

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शरद पवारांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. ''त्यांची लायकी नाहीये.. सध्या ते माझ्यावर आणि कुटुंबावर वैयक्तिक हल्ले करीत आहेत. धनंजय मुंडेंना कशाकशातून बाहेर काढलंय, याची जर यादी काढली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल'', असं शरद पवार म्हणालेत.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

'पुलोद'चं सरकार स्थापन केलं तर संस्कार म्हणायचे आणि दादाने केलं तर गद्दारी म्हणायची. हे दादांनी एकट्याने केलं नाही... असंख्य जणांनी केलं. लोकशाहीचा निर्णय होता. २०१४ मध्ये जे केलं ते संस्कार आणि दादाने केलं गद्दारी आहे. २०१७ मध्ये गणेश चतुर्थीला एक बैठक झाली.. कुठे? कशी बैठक झाली? दिल्लीला कुणाच्या घरी बैठक झाली? शिवसेनेला कसं बाजूला काढायचं हे कसं ठरलं? त्या बैठकीचे व्हिडीओ देऊ शकतो. तुम्ही केलं ते संस्कार आणि आम्ही केलं तर गद्दार? असं धनंजय मुंडे म्हणाले होते?

शरद पवारांचा जोरदार पलटवार

धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांनी उत्तर देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, मी त्यांना उत्तर देणार नाही. ज्यांचं नाव तुम्ही घेता त्यांची लायकी नाही. त्यांना कशाकशातनं बाहेर काढलं, याची यादी काढली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल. त्यांनी केलेले उद्योग.. मी सध्या सांगू इच्छित नाही.

पवार पुढे म्हणाले की, लहान कुटुंबातला, लहान समाजाला एक उदयोन्मुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरुन विरोधी पक्षनेते पदाची जबाबादीरी दिली होती.. लोकांची नाराजी होती तरीही जबाबदारी दिली. तेच आता माझ्यावर व्यक्तिगत आणि कुटुंबावर हल्ला करत आहेत. आज त्यांच्याबद्दल मी शेवटचं बोललो, त्यांच्यावर आता यापुढे भाष्य करणार नही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Pune University : पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा संघटनांचा आरोप

Pune News : विना अडथळा खोदकाम करता येणार; पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT