Sharad Pawar and Mohan Bhagwat 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: भागवतांच्या 'ब्राह्मणांनी प्रायश्चित करावं' या विधानावर पवार म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जातिव्यवस्थेवर मोठं भाष्य केलंय. वर्ण आणि जातिव्यवस्था या भूतकाळातील गोष्टी आहेत आणि त्या विसरल्या पाहिजेत, असं भागवतांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी शोषणासाठीच्या जबाबदार समाजाने पापक्षालन अर्थात प्रायश्चित करावं, असं म्हटलं होते.

यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मधल्या काळात आपण शास्त्राने आणि लोक रुढीने धर्म सोडला आहे. त्यामुळे त्या पापाचे क्षालन करायला हवं, अस मोहन भागवत यांनी म्हटलं. यावर वाद निर्माण झाला असून ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. ब्राह्मण महासंघाकडून मोहन भागवत यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला आहे. तर मराठा समाजाने भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं आहे.

भागवत यांच्या विधानावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, काही पिढ्या यातना सहन करत आहे. त्या यातनांसाठी जे जबाबदार आहे, त्या घटकांना याची जाण होत आहे. हा बदल योग्य आहे. पण नुसतं माफी मागून चालणार नाही, आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गासंबंधीची भूमिका कशी घेतो यावर सर्वकाही अवलंबून आहे, असंही पवार यांनी म्हटलं.

मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू-मुस्लिमांचं डीएनए एकच असल्याचं म्हटलं होते. त्यांनी एका मशिदीलाही भेट दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT