Nilesh Zalte
महाराष्ट्र बातम्या

राणे प्रकरणावर शरद पवार म्हणतात; "त्याला मी..."

विनायक होगाडे

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद पेटला आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून राज्यभर आंदोलने केली जात आहेत. नारायण राणे यांच्यावर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे आणि तक्रारी दाखल झाल्या आहेत. नाशिक आणि पुणे पोलिस नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी रवाना झाले आहेत. नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी राणे यांना कायदेशीर अटक करण्यात येणार असल्याचं सांगितलं. राणे यांनी पत्रकार परिषद घेत, अटक करायला मी काय सामान्य माणूस वाटलो काय? अशी तिखट प्रतिक्रिया दिलीये. तर दुसरीकडे विरोधीपक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनीही भाजपची भुमिका स्पष्ट केली आहे. राणेंच्या विधानाच्या पाठीशी भाजप नाही, पण राणेंच्या पाठीशी मात्र पक्ष उभा आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य नारायण राणे यांना भोवलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी याप्रकरणावर फारशी सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

मी राणेंना महत्त्वही देत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय. शरद पवार यांनी नारायण राणे प्रकरणावर बोलणं टाळलं आहे. त्यांनी म्हटलंय की, मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात, अशा मोजक्याच शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT