महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ''मीसुद्धा शेतकरी दिंडी काढली होती...'', रोहित पवारांच्या यात्रेवरुन शरद पवार बोलले

संतोष कानडे

पुणेः राज्यातील तरुणांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते या यात्रेला सुरुवात झाली. पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मी जळगावपासून शेतकरी दिंडी काढली होती. नागपूरच्या अधिवेशनात दिंडी नेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. आज त्याहीपेक्षा मोठी यात्रा निघतेय. ही दिंडी नव्या पीढीची आहे. नव्या पिढीला प्रोत्साहन देणारी आहे.

पवार पुढे म्हणाले की, राज्यामध्ये युवकांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. परंतु सरकारचं अजिबात लक्ष नाही. तरुणांनी सरकारला प्रश्नांची जाणीव करुन द्यावी. त्यासाठीच ही यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. रोहित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी मी हवी ती मदत करायला तयार आहे, असे ते म्हणाले.

शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यामध्ये शिक्षण क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. शिक्षकांची लाखो पदं रिकामी आहेत. ती भरली जात नाहीत. एकीकडे शाळा सुरु आहेत तर दुसरीकडे शिक्षक नाहीत. असं म्हणत पवारांनी सरकारवर ताशेरे ओढले.

रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा राज्यभर फिरणार आहे. मंगळवारी यात्रा जालन्यात असेल आणि कुटुंबातील अनेक सदस्य यात्रेमध्य सहभागी होतील, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं होतं. या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक तरुण सहभागी होणार आहे. सरकारला प्रश्नांची जाणीव करुन देऊन ते सोडवण्यासाठी आवाज उठवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT