Sonia-and-Sharad 
महाराष्ट्र बातम्या

...तर देशाची नाचक्की झाली असती; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज दोन दिवसांपूर्वी लोकसभेत घडलेल्या प्रकाराबद्दल ट्विटरवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार यांनी अनेक विषयांना हात घालत आपली भूमिका स्पष्ट केली. (Sharad Pawar news in Marathi)

शरद पवार ट्विटमध्ये म्हणाले की, लोकशाहीत वेगवेगळी मत असतात. त्या मताशी शंभर टक्के तुम्ही सहमत होता, असे नाही. हे जरी खरे असले तरी मत ऐकण्याची भूमिका घ्यावी लागते. मात्र ते चित्र दिसत नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या खासदारांकडून एक शब्द चुकीचा गेला ही चूक होती. चूक लक्षात आल्यावर त्यांनी याची माफी मागितली. मात्र हट्ट काय केला, तर जो बोलला त्याबद्दल कोणी काही बोलले नाही तर सोनिया गांधींनी माफी मागावी.

पवार पुढं म्हणाले की, विधान केलं दुसऱ्याने आणि माफी तिसऱ्याकडून मागता. त्याबाबतीत सभागृह थांबल्यावर , सोनिया गांधी यांनी एका भाजपच्या ज्येष्ठ महिला खासदारांना माझ्यावर हल्ला का होतोय, माझ्याकडून माफी का मागितली जातेय असे विचारण्यासाठी गेल्या तर त्यांच्या अंगावर सबंध सभासद धाऊन आले. अगदी मंत्रिमंडळात असलेले मंत्रीही धावून आले. यातून काही वेगळा प्रकार होण्याची शक्यता होती. सुदैवाने राष्ट्रवादीच्या खासदारांनी सोनिया गांधीना तिथून बाहेर काढले. हे झालं नसतं तर सदनामध्ये एक भीषण चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. सबंध जगात भारताची नाचक्की झाली असती, असंही पवार यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

Xi Jinping दिल्लीत दाखल; सोबत काय आणले? 15 हजार पोलीस, ‘भयानक’ ताफा अन् खास कार-विमान

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Jharkhand Health : कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयांत ‘डे-केअर सेंटर’, आयुष्मान कार्डधारकांना पॅकेज दरात उपचार

SCROLL FOR NEXT