Sharad PawarAjit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : अजित पवारांना पद का दिलं नाही?, शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं

Sandip Kapde

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) मध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  शरद पवार यांनी दिल्लीत ही घोषणा केली.  सुप्रिया यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रमुखपदीही करण्यात आले आहे. पक्षाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शरद पवार म्हणाले चर्चेतून सहकाऱ्यांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. महिन्यात ४ वेळा इतर राज्यातील संघटना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

२३ जूनला पाटनामध्ये विरोधकांची सभा आहे. भाजपची ताकद जास्त असणाऱ्या ठिकाणी विरोधकांना एकत्र आणणार आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

पुढील पक्षाध्यक्ष कोण -

कार्यकारी अध्यक्ष पुढील अध्यक्ष होणार का? यावर शरद पवार म्हणाले, लोक आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षा करण्यात आले आले. इतर सहकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय आधीच केला होता.

पक्षाध्यक्षाची जागा खाली नाही जेव्हा जागा खाली होईल तेव्हा बघू. अजित पवार नाराज असल्याची बातमी खरी नाही. जयंत पाटील आज प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार विरोधीपक्षनेते आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.  त्यांच्यावर आधीच जबाबदारी आहे. अजित पवार नाराज नाहीत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांनी दिला होता राजीनामा -

नुकतेच शरद पवार यांनी पक्षप्रमुखपदाची जबाबदारी सोडण्याची घोषणा केली होती. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी आणि नेत्यांच्या समजूतीनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. पवार यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने ५ मे रोजी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला होता आणि त्यांना पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती. आता पक्षाच्या हायकमांडने दोन नवीन कार्याध्यक्षांची नियुक्ती करून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT