Sharad Pawar reached Kanher village in Solapur district for a general worker 
महाराष्ट्र बातम्या

सामान्य कार्यकर्त्यासाठी शरद पवार पोहचले सोलापूर जिल्ह्यातील कन्हेर गावात 

सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला आधार कसा द्यावा, त्याच्या पाठीवर कशी थाप टाकावी हे फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांकडून शिकावे, असे आतापर्यंत सांगितले जात होते. त्याचाच प्रत्यय आज सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्राला आला. माळशिरस तालुक्‍यातील एक सामान्य कार्यकर्ता पवार कुटुंबियांशी एकनिष्ठ असणारे रमेश पाटील यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. आज श्री. पवार या कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासाठी थेट माळशिरस तालुक्‍यातील कन्हेर या महादेव डोंगरात वसलेल्या छोट्याश्‍या गावात दाखल झाले आणि रमेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. 
रमेश पाटील यांच्या वडिलांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते. रमेश पाटील यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार हे थेट कन्हेर (ता. माळशिरस) या छोट्याशा गावात आपल्या सहकाऱ्यांसह आले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पाटील आदी मान्यवर होते. सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार फलटण, नातेपुते मार्गे कन्हेर येथे आले. पाटील यांच्या वाड्यावर रमेश पाटील, चुलते अंबादास पाटील, वसंत पाटील, चंद्रकांत पाटील व सर्व कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधला. वडिलांच्या वयाची चौकशी केली. शेतीविषयक गप्पा मारल्या. सर्व कुटुंबीयांनी त्यांच्या पश्‍चात चांगले राहावे, चांगली शेती करावी, असे श्री. पवार यांनी सांगितले. 
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते अक्षय भांड, गौतम माने, इंद्रजीत रुपनवर, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज खाडे, गजानन पाटील, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Book Festival: तब्बल ३५ वर्षांनी झाली दोन भावांची भेट; ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवात उलगडले ‘आनंदाचे पान’!

Latest Marathi News Live Update : शिवसेनेचे सर्व नगरसेवक उद्या कोकण भवनला जाणार

शुभमन गिल vs रवींद्र जडेजा! न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचे दोन शिलेदार एकमेकांसमोर... जाणून घ्या नेमकं काय घडलंय

Nashik Kumbh Mela : भव्य 'रामकाल' पथाच्या नावाखाली नाशिकचे प्राचीनत्व हरवणार? कुंभमेळ्याच्या तयारीने चिंता वाढली

Education News : दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! उद्यापासून मिळणार परीक्षेचे हॉलतिकीट

SCROLL FOR NEXT