sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'पार्ट टाइम मुख्यमंत्री' या भाजपच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर

भाजपाच्या या वक्तव्यात काही दम नाही, मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो.

सकाळ डिजिटल टीम

राज्याला पार्टटाइम मुख्यमंत्री नको, या भाजपाच्या टीकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिखट प्रतिक्रीया दिली आहे. भाजपाच्या या वक्तव्यात काही दम नाही, मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो. त्यांना जबाबदारी दिली आहे, जनतेने स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ऑपरेशनचे संकट असूनही त्यांचं काम सुरू आहे, अशा शब्दांत पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. काँग्रेसचे नेते योगानंद शास्री यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या भूमिकेच समर्थन केले. ते म्हणाले, समीर वानखेडे यांच्या अधिकाराचा गैरवापराबाबत नवाब मलिक बोलत आहेत. वानखेडे प्रकरणात केंद्रानेही लक्ष दिले पाहिजे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली. त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटणे हे योग्य नाही. पण राज्यात जे झाले, ते धर्मांध शक्तीमुळे झाले आहे. देशात धर्मांध शक्तीचे आव्हान आहे. महाविकास आघाडी काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचा भाजप राज्य कार्यकारिणीत ठराव केला, हा हास्यस्पद ठराव असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, देशात समविचारी पक्षांनी राष्ट्रहितासाठी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करत आहे. सांप्रदायिक शक्तींना पर्याय दिला पाहिजे. भाजपला रोखण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. समविचारी पक्षांना बरोबर एकत्र घेत आहोत. पण त्याबरोबर आमचे घरही आम्हाला मजबूत करावे लागेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT