Ram Mandir Invitation 
महाराष्ट्र बातम्या

Ram Mandir Invitation: शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, घेतली 'ही' भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. शरद पवार यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहिले आहे.

Sandip Kapde

Ram Mandir Invitation: 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील श्री राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात राम लल्लाचा अभिषेक सोहळा होणार आहे. अभिषेक करण्यापूर्वी 18 जानेवारीला रामलल्लाती मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Shri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra Trust) सरचिटणीस चंपत राय पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची माहिती दिली ​​आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. शरद पवार यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहिले आहे.

22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर मी मोकळेपणाने वेळ काढून दर्शनासाठी येईन आणि तोपर्यंत राम मंदिराचे बांधकामही पूर्ण होईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. (ram mandir inauguration)

चंपत राय यांना लिहलेल्या पत्रात शरद पवार काय म्हणाले?

"22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी भक्तांच्या भक्तीचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. अयोध्येतील सोहळ्याबाबत रामभक्तांमध्ये उत्सुकता असून ते मोठ्या संख्येने तेथे पोहोचत आहेत.

या ऐतिहासिक घटनेचा आनंद त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचेल. 22 जानेवारी रोजी उत्सव पूर्ण झाल्यानंतर, श्री राम लल्लाचे दर्शन सहज आणि आरामात घेता येईल. मी अयोध्येला येण्याचा विचार करत आहे, त्यावेळी मी भक्तीभावाने श्री राम लालाजींचे दर्शन घेईन. तोपर्यंत राम मंदिराचे बांधकामही पूर्ण झाले असते.

तुमच्या सौहार्दपूर्ण निमंत्रणाबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृपया माझ्या शुभेच्छा स्वीकारा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT