Congress on Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांची निवड 'ही' समिती करणार! कोण आहेत सदस्य जाणून घ्या

'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घोषणा केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केली. यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समितीही गठीत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच या समितीमध्ये कोण सदस्य असतील याची संभाव्य नावंही त्यांनी आपल्या भाषणातच जाहीर केली.

शरद पवारांनी सुचवलेल्या समितीतील संभाव्य नाव

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य लोकांचा समावेश करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे.

ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणं जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्यानं झटत राहिलं असा मी विश्वास व्यक्त करतो. मी अध्यक्षपदावरुन जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही, असंही शरद पवार यांनी भाषणात सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचे हाल! हजारो कोटी खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह

म्हणून मी दुसरं लग्न केलं... मेघा धाडेने सांगितलं दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्याचं कारण; म्हणाली- त्या दिवशी मला जाणीव झाली की...

Nilesh Lanke : अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विद्यापीठासाठी खासदार लंके यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

Ladakh Army Vehicle Accident: लडाखमध्ये लष्कराच्या वाहनावर कोसळला खडक; एका अधिकाऱ्यासह तीन जवानांचा मृत्यू

Horoscope 2025 : 'या' 4 राशी आहेत सगळ्यात जास्त आहेत लोभी; प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जातात

SCROLL FOR NEXT