Sharad Pawar Resigns esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: 'जयंत पाटील नैराश्यातून राष्ट्रवादी सोडून जातील'; भाजप नेत्याची NCPवर टीका

महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली

रुपेश नामदास

पंढरपूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे.

खासदार विखे-पाटील म्हणाले की, शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे भाजप-सेनेच्या विरोधात तयार करण्यात आलेली महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नैराश्यातून जे वक्तव्य केले आहे, त्यावरून ते ही राष्ट्रवादी सोडून जातील असे वाटते.

खासदार सुजय विखे-पाटील हे बुधवारी (ता.३) श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.

यावेळी खासदार विखे-पाटील म्हणाले की शरद पवार यांचा राजीनामा ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे. जशी समुद्राची वाळू मूठीत घट्ट पकडल्यानंतर ती तितक्याच वेगाने ढिली होते. त्याप्रमाणे महाविकास आघाडी

वज्रमूठ म्हणजे समुद्रातील वाळू घट्ट धरल्यानंतर जशी हातातून निसटते तसा एक प्रकार आहे. राज्यात आणखी काही घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे आताच त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिच राष्ट्रवादीचा निम्मा कार्यक्रम केला आहे. आता राहिलेला कार्यक्रम देखील ते करतील असा टोला ही खासदार विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.

मंदिर समितीच्या वतीने खासदार सुजय विखे-पाटील यांचा सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, प्रांताधिकारी गजनन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, व्यस्थापक बालाजी पुदलवाड, प्रणव परिचारक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT