महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : NCP च्या अध्यक्षपदावरुन राहुल गांधींचा थेट सुप्रिया सुळेंना फोन; म्हणाले...

राष्‍ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून गोंधळ सुरू असतानाच राहुल गांधींचा थेट सुप्रिया सुळेंना फोन

धनश्री ओतारी

Sharad Pawar Resigns राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून गोंधळ सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा थेट फोन खासदार सुप्रिया सुळे यांना आला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. अशातच राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे यांना थेट फोन करत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत आपले मत मांडले आहे.

राहुल गांधी यांनी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. अशी विनंती राहुल गांधी यांनी केली. तसेच शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.

तसेच, राहुल गांधी यांच्यासह तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांच्या निर्णयासंदर्भात फोन केला होता.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेने पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर शरद पवार यांचा हा मोठा राजकीय डाव असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याला विरोध होत असताना काल अजित पवार यांनी समर्थन केले होते.

त्यामुळे पुढील राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार की सुप्रिया सुळे, अशी चर्चा रंगली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT