महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? तर अजित पवार यांचं काय..?

Sandip Kapde

Sharad Pawar Resigns : शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेने पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर शरद पवार यांचा हा मोठा राजकीय डाव असल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्याला विरोध होत असताना काल अजित पवार यांनी समर्थन केले होते. त्यामुळे पुढील राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार की सुप्रिया सुळे, अशी चर्चा रंगली होती.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रात ताई तर राज्यात दादा अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे काय जबाबदारी असले, अशी चर्चा रंगली आहे.

अजित पवार हे राज्यातील मोठे नेते असतील. तसेच २०२४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असतील. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. तर अजित पवार राज्याचे राजकारण सांभाळतील.

मात्र या निर्णयामुळे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. भाजपला पाठिंबा देण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना यामुळे धक्का बसल्याची चिन्हे आहेत. अजित पवार अध्यक्ष झाले असते तर महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्यची शंका होती. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे फार जमत नाही. मात्र सुप्रिया सुळे महाविकास आघाडी स्थिर ठेवतील. राष्ट्रीय राजकारणाच देखील त्यांचा वेगळा ठसा उमटला आहे.

अजित पवार यांचा केंद्रातील नेत्यांशी देखील फार सबंध नाही जेवढा सुप्रिया सुळे यांचा दबदबा आहे. दुसरं म्हणजे महिलेला पक्षाचे अध्यक्ष केल्यामुळे राष्ट्रवादीची सकारात्मक प्रतिमा निर्माण होणार आहे, याचा विचार शरद पवार यांनी केला असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT